मी फक्त तुझीच
मी फक्त तुझीच
आयुष्याच्या या वळणावर जेव्हा वाटतंय मला की असावं कोणीतरी बरोबर,
तुझाच विचार करू शकते मी, चूक असो वा बरोबर.
सोबतीने प्रवास करताना आडवळणंसुद्धा येतील,
पण तू सोबत असलास तर तीसुद्धा सरतील
प्रेम म्हणजे मी तुला समजून घेणं, तू मला समजून घेताना,
काय पाहत असते मी मलाच माहित नाही, पण
वेगळच समाधान मिळतं मला तुला पाहताना
तु्झ्या मनातही तुझ्या आवडीचं एक चित्र नक्की असेल,
प्रयत्न केलास तर तुलाही ते दिसेल...
त्या चित्रात तुला माझं प्रतिबिंब दिसलं,
तर ती आपल्या प्रवासाची सुरूवात असेल!
कधीतरी एकत्र असण्याला एक वेगळा अर्थ असेल...
मला तुझी आणि तुला फक्त माझी सोबत असेल!
त्या सहवासाची सुरूवात आपण करू, पण नियतीला
सुद्धा त्याचा शेवट करणं मान्य नसेल...
नियतीला सुद्धा त्याचा शेवट करणं मान्य नसेल.
