अंतर.
अंतर.
आज पुन्हा तुझी आठवण आली आणी जाणवलं आपल्यातलं अंतर,
अंतर मनातलं पार केलंय मी, पण मैलांच अंतर ...
जेव्हा कधी मनात प्रेम जाणवतं, तेव्हा तु आठवतोस,
असं वाटतं माझ्यातलं सौंदर्य तुच मला जाणवून देतोस.
रोजचं उठणं, रोजचं झोपणं, तु नसताना तुझ्यासाठी सुंदर दिसणंही रोजचंच,
आता तुझी आठवण काढणं सुद्धा झालंय रोजचंच.
खात्री आहे मला हे अंतर ओलांडून आपण नक्की एकत्र येऊ.
सुखाचे, समाधानाचे, समृद्धिचे, प्रेमाचे अनमोल आणि सुंदर क्षण एकमेकांना देऊ.
ही खात्रीच मला तुझ्याशिवाय जगण्याचे बळ देऊन जाते...
तुझ्या भेटीची आसही इतकी समृद्ध आहे की त्यामुळे,
हे अंतरही मला आता हवेहवेसे वाटते...
खरंच सांगते,
हे अंतरही मला हवेहवेसे वाटते.

