STORYMIRROR

Kanaka Ghosalkar

Abstract

4  

Kanaka Ghosalkar

Abstract

चहाची वेळ.

चहाची वेळ.

1 min
1.1K

कधीतरी आमच्याकडे चहाला या, कधीतरी आमच्याकडे चहाला या,

चहातर उत्तमच मिळेल, पण त्यासोबत मिळणारं समाधानही घ्या.


असतो आमचा चहा झकास, आलं वेलची घातलेला,

आवड नसेल तर औषध म्हणून घ्या,

पण, कधीतरी आमच्याकडे चहाला या.


विषय निघतील शेजार्यांचे, काका मामांचे,

आनंदाचे आणि दुःखाचे.

सोबत, गरम गरम थालिपीठही घ्या...

कधीतरी आमच्याकडे चहाला या.


चहाची वेळ मला फार आवडते.

थकलेल्या दिवसाचा गिअर जणू बदलून टाकते.

संपवते कामाचं टेंशन सहज रित्या.

म्हणूनच म्हणते, कधीतरी आमच्याकडे चहाला या.


तुम्ही तुमच्या यांना आणि तुम्ही तुमच्या हिला

बरोबर घेऊन या...

पण, आज माझ्या घरची चहापावडर संपली आहे,

तेव्हा जरा चहा बनवून बरोबर घेऊन या.

मात्र, आठवणीने आमच्याकडे चहाला या!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract