ऋतू हिरवा
ऋतू हिरवा
सरसर झरझर
धारा बरसती
मन तृप्त अलवार
सृष्टीवर मोती (१)
वर्षाऋतू हिरवाई
शालू पाचूवर्णी
ऋतू सजवी सृष्टीस!!
मना अपूर्वाई (२)
अलंकार फळे फुले
वसुंधरा खुले
मन झुल्यावरी झुले
अवखळ खुळे (३)
नभी इंद्रधनू गोफ
रंगांची बहार
कुंद ओलेत्या हवेत
गारवा शहार (४)
ऋतू हिरवा बहरे
वसुंधरा सजे
नयनकमलांमधे
तृप्तभाव दाटे (५)
