Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तूच माझा राजा

तूच माझा राजा

1 min
169


गोरा राजबिंडा , सशक्त हसरा

मदन राजसा , तूच माझा राजा


नजर मिळता , झुकली पापणी

प्रेमाची पावती , नकळत्या क्षणी

प्रेमाला आपल्या , मिळाली संमती

सफल प्रेमिक , विवाहबंधनी


गोड मधुचंद्र , समर्पित प्रीती

काही महिन्यांनी , रोज झकाझकी

कामासाठी कोण?, प्रश्न रोजचाच

पेल्यात वादळे , वादही दोघांत


प्रेमाच्या जाळ्यात , भार्या अडकवे

मधूर भाषणी , रोज काम लावे


तूच माझा राजा , रोज लोणी लावी

काय करु आता?, नाईलाज काही


नाही भुलू कधी , गोड बोलण्याला

नाही भुलू कधी , तिच्या विभ्रमांना


नाही तर राजा , रोज काम करी

राणी मात्र रोज , गोड गप्पा मारी


Rate this content
Log in