लग्न
लग्न
अग्नीसाक्षीने दोन जीवांचे
जन्मोजन्मीचे जुळते नाते,
अक्षदारुपी देती आशीर्वाद
शुभमंगल हे लग्न होते.
ऋणानुबंधाच्या रेशीम गाठी
मान्यता समाज, कायदयाची,
ग्रहस्थाश्रमीचे हे पहिले पाऊल
पावन सुरूवात ही नव जीवनाची.
