प्रेमाची सोबत
प्रेमाची सोबत
सावली माझी सप्तरंगी, तुझ्याच आठवणींचे रंग,
सावलीच्या त्या गर्द रंगात, असू आपण संग
प्रेमात तुझ्या मी न राहिले माझी, तूच हळुवार
घडवतो आहेस मला, कृतघ्न आहे मी तुझी...
तुझं ते तसं आणि माझं हे असं आता राहिलेलं नाही,
तुझ्यावरची श्रध्दा इतकी आहे की मी देवाला फुल वाहिलेलं नाही...
तुला हसताना पाहिलं की माझं मन खुलून जातं...
सुखाला तुझ्या कधी दृष्ट लागू नये असं मला वाटतं
ज्योत तुझ्या जीवनाची सदैव तेजस्वी राहो...
यशाचे नवनवीन शिखर चढताना तुझी नम्रता कायम राहो
आयुष्याची वाट तशी चढउतारांची असते,
कधी ती आपल्यासोबत असते तर कधी ती नसते
या वाटेवर आपण भेटलो तो क्षण होता अविस्मरणीय,
सोबती माझे खूप आहेत, पण नाही तुझ्या इतका कुणी प्रिय...
