STORYMIRROR

Kanaka Ghosalkar

Others

4  

Kanaka Ghosalkar

Others

जगण्याची कला.

जगण्याची कला.

1 min
333

जगणं ही एक कला आहे, ती शिकण्याची गरज तुला आहे, मला आहे.


सरळ नाकासमोर चालत असताना कधीकधी वळणं दिसत नाहित.

सुख भरपूर मिळतं, पण चवीला थोडं दुखःही असतं त्या सहित.


जपून ठेवावेत सगळे रंग, सर्व आठवणी आवर्जून आपल्या वहीत.

त्या रंगांची होतील कधीतरी फुलपाखरं, भुरकन उडून जी करतील हे जग आणखीन रंगीत.


रंग आले, आली कला, तुला आणि मला, की आयुष्य होईल आपल्याला जोडणारं एक मधुर गीत.

त्या गीतातले सुर, शब्द, लय नव्हते आपल्या ओळखीचे, पण आता सर्व वाटताहेत आपले मीत.


मैत्र असे लाभल्यावर गरजेची वाटत नाही रीत,

वाटेत कितीही वळणं आली तरी असू आपण धीट.


हा धीरच आपल्याला आयुष्यात पुढे नेणार आहे.

म्हणूनच म्हणते,

जगणं खरंच एक कला आहे,

ती शिकण्याची गरज तुला आहे,

मला आहे.


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை