STORYMIRROR

Kanaka Ghosalkar

Abstract Others

4  

Kanaka Ghosalkar

Abstract Others

वसंत

वसंत

1 min
369

आज आकाशात मळभ दाटलय,

माझ्या मनातलं माझ्या मनातच साठलय.

पाऊस पडेल आणि स्वच्छ होईल आकाश,

मला मोकळं व्हायला मात्र आहे अजून अवकाश.


प्रत्येक क्षण परिक्षेचा, काळोख्या भुयारातून

गेल्यानंतरच दिसतो मला प्रकाश.

सतत सतावणारे प्रश्न करू पाहतात

माझ्या मोकळ्या मनाचा ह्रास.


इतक्या वर्षांपासून नको असलेला सोबती तो.

आयुष्याची माझ्या नाहिशी करतो गती तो.

हरणार नाही मी असं पक्कं ठरवलंय आता,

गती कमी असुनही बघेल माझी प्रगती तो.


अखंड दुःखाचा ऋतू तो मला दाखवून गेला होता,

गर्द माळरानात माझी पानझड होताना पाहत होता.

माझ्या आयुष्यात वसंत येईल याची खात्री आहे मला,

तो तर काही वेगळच भाकित सांगत होता...

तो तर काही वेगळच भाकित सांगत होता.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract