मैत्रीची फुलं
मैत्रीची फुलं
मैत्रीला रंग तुझ्या सोनेरी, मैत्रीला रंग तुझ्या सोनेरी ।।
काही वर्षांपूर्वीचीच भेट आपली, आपापल्यापरीने आपण ती जपली,
लावले जे मैत्रिचे झाड आपण, तेच आता आपल्याला देतय सावली ।।
आई–वडील जन्मापासून मिळतात, तसेच मिळतात नातेवाईक.
मित्र मात्र काहीच खास असतात... असतील जरी कैक ।।
माझ्यासाठी तुझी मैत्री म्हणजे तुझ्यासोबत चालणं, तुझ्याशी बोलणं...
: black;">आणखी देवाकडे आता काय मागू मी, हेच तर आहे खरंखुरं जगणं ।।
मैत्रीत नसावेत हेवे - दावे, नसावेत रूसवे - फुगवे, मैत्रीची
फुलं असतात सोनेरी, झाड असले जरी ते नितळ, हिरवे ।।
सोनेरी फुलं ही देईन मी तुझ्या ओंजळीत आयुष्याच्या प्रत्येक
टप्यावर...होईन श्रीमंत मीच खरंतर तुला ही फुलं दिल्यावर ।।
उत्तरायणात असेल आपल्याकडे या सोनेरी फुलांची साठवण.
कितीही लांब गेले तरी कायम सोबत असेल तुझी आठवण।।