प्रार्थना
प्रार्थना
शक्तीशाली बलशाली
परब्रम्ह निराकार
त्रिखंडाचा तूच त्राता
परमेशा दे आधार
असो आस्तिक नास्तिक
नको भेदभाव करु
तार आम्हां सकलांना
समर्थच तुज स्मरु
नास्तिकांचे हो आस्तिक
संकटाची ही किमया
हात जोडोन प्रार्थना
करी दीनांवरी दया
तूच समर्थ जगती
विपदांना आपदांना
हटवावे वेदनांना
सुखी करावे सर्वांना
शक्ती अचाटच तुझी
मनी विश्वास समर्था
धाव आता जगदीशा
तार आम्हां दीनानाथा
