STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

कोकणचा शेतकरी

कोकणचा शेतकरी

1 min
376

कोकणचा शेतकरी 

हाय किडकिडीतच

रहातोय आनंदाने

सुखी आहे शेतीतच


जोरदार पावसाचं

कोकणला वरदान

भात लावणी करतो

नित्य गुडघा पाण्यात 


नित्यनेमे शेतामधी

राब राब कष्ट करी

सुखी मिळेल त्यामधी

हास्य नित्य मुखावरी


नको लबाडीचा पैसा

नको फसवणे कुणा

शेत दिलंय देवानं

कधी मिंधा नाही कुणा


आंबे सुपारी लावतो

चार पैसे कमावतो

पाहुण्याची आनंदाने

सोय छानच करतो


स्वाभिमानी सचोटीचा

कोकणचा शेतकरी 

जग पुढे गेले तरी

आनंदाने शेती करी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract