करोना कुठे काय करतो..
करोना कुठे काय करतो..
आई कुठे काय करते,
दिसत नाही पण जाणवतं
करोनाचं ही असंच आहे
दिसत नाही पण जाणवतो
आई जगण्याची उमेद असते
आई जगणं सुखद करते
करोना जगणं दुःखद करतो
आई प्रमाणे करोना सयंम शिकवतो,
करोना शिस्त लावतो
संवाद शिकवतो, घडवतो,
स्वच्छतेच्या सवयी लावतो
आई जगण्याचं छत असतं
करोना माणसाचं प्रेत असतं
आई देते अमुल्य शिकवण
करोना देतो फक्त मरण
आई कधीच अंतर देत नाही
करोना शिकवतो अंतर ठेवायला
जिवंत माणसाचं प्रेत केलं करोनाने
जगण्याचे दोर कापले करोनाने
गळाभेट सोडा आता साधी भेटही अवघड आहे
टेक केअर म्हणणं एवढंच
आपल्या हातात आहे.
