STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Tragedy

3  

Sanjay Ronghe

Abstract Tragedy

माझा मी न उरलो

माझा मी न उरलो

1 min
228

कुठे ते चंद्र तारे

कुठे ते गार वारे ।

रात्रीच्या वादळात

गेलेरे उडून सारे ।


नशीबातच कष्ट

कुणा म्हणू रे दुष्ट ।

माझा मीच झालो

किती आता रे भ्रष्ट ।


भकेले जेव्हा पोट

पितो पाण्याचे घोट ।

हक्क मागतो जेव्हा

मिळे पाठीवर सोट ।


कष्ट करी हे हात

नाही कुणाची साथ ।

लाचार जिणे सारे

दिसे अश्रू डोळ्यात ।


माझा मी न उरलो

जीवनात हरलो ।

एकटा मी प्रवासी

नकळतच सरलो ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract