जीवन...
जीवन...
गहु नाही ज्वारी नाही
असे म्हणत ओरडु नका...
जे होईल ते पहात रहा
दोष कुणा लावू नका...
जीवन म्हणजे काय
कुठे नाही अजून
जीवन नव्हे ऐश्वर्य
कष्ट करावे कसून...
रेशनिंगच्या क्यू साठी
नित्य आपुली घाई
हेच तेरे जीवन
हे विसरुन चालायचे नाही
आधी सोसावे काटे दुःखाचे
नंतर भोगावे सुख जीवनाचे
उपभोगण्या जीवन आजचे
उघडावे व्दार स्वार्थ त्यागाचे
