रोबो
रोबो
शाळेत जायचे होते मला
खेळायचे होते मित्र मैत्रिंणींबरोबर
मैदानावरती खेळतांना पळायचे होते
इकडे तिकडे फुलपाखरांसारखे!
शाळेतल्या बाकावर बसुन
बाईंकडनं शिकायचे होते पुस्तकातले धडे
धडे शिकतांना मज्जामस्ती करायची होती
माझ्या बाकावरच्या मैत्रिणीशी कानात गुजगोष्टी करायच्या होत्या
हातात हात घालुन शाळेभोवती फिरायच होत!
नविन घेतलेला फ्रॉक दाखवायचा होता,
लपुन दप्तरात ठेवलेले गोष्टीच पुस्तक दोघींनी मिळून वाचायचे होते
पण.. पण.. आता ह्या ऑनलाईन शाळेत, बोलाता येत
दिसता येत ...
पण हरवुन गेल ते हातात हात घालुन फिरण, घट्ट मिठी मारन
भेटलो परत एकदा तर रोबो असल्यासारख तर वाटणार नाहीन?
कारण भावना व्यक्त करतांना स्पर्शातल्या भावना आटल्या नसतील नं?
