मनशिल्प
मनशिल्प
दगडाचं अस्तित्व दुभंगल्या शिवाय शिल्प नाही
माणसाचे दुर्गुण दुभंगल्या शिवाय कायाकल्प नाही
विचारांचे पीक मेंदूच्या कोरडवाहू, बागायतीवर ठरतं.
विचारांनाही असतो ग्लायसेमिक इंडेक्स.
नात्यांना ही पीएच लेव्हल असते
म्हणून त्यांनाही लॉक अनलॉक करता आलं पाहिजे.
इच्छाअकारहीन अमिबा आहे म्हणून तर व्यक्तिमत्त्वाला कंगोरे आहेत.
नातीं जेव्हा घरातून हद्दपार होतात तेंव्हा शोभेचे निवडुंग घर सजवतात.
क्षणांच ओझं जेव्हा मणांच होतं तेव्हां मनाच्या अस्तित्वाचा कसं लागतो.
शरीरातलं मन फुलवणे म्हणजे
स्वत:च्या जीवनाचं शिल्प स्वत:ला कोरता येणं.
