STORYMIRROR

manasi kanitkar

Abstract

3  

manasi kanitkar

Abstract

त्याची मैफिल!

त्याची मैफिल!

1 min
244

सरी चार कोसळल्या 

सुगंध दिशांना पसरले 

आले ढग दाटून 

अन् कल्लोळाने घर केले! 


पडणाऱ्या पावसाला 

गवसला होता सुर 

मैफिलीत या भावनांच्या 

आला मग पूर!


केले मन मोकळे त्याने

सरींचे ही गाणे झाले

सुख-दुःखाचे डोह मग

आरसपानी स्वच्छ झाले!


कधी लावला मंद्र त्याने

कधी लावली तार

गुंफुन मग सप्तसूर

सहज घेतली त्याने लकेर!


सुर कातर झाला त्याचा

मैफीलीच्या शेवटी

गडगडण्याच्या जल्लोषात मात्र

हुकली निरोपाची भेट ती!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract