STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

सह्याद्री

सह्याद्री

1 min
1.3K

झऱ्यांचा खळखळाट

पानांची सळसळाट 

निसर्गाने आच्छादलेला हिरवागार शालू परिधान केलेला 

डोंगरमाथा आणि घाट  

सह्याद्रीचे हे अनोखे रूप शोभून दिसे भन्नाट 


कोकण किनारयाला समांतर असलेली सह्याद्री 

गड किल्यांच्या रत्नमयी शोभे 

नभा नभातून दरया खोरयातून आजही गर्जिते

 

भटकंती या किल्ल्याची देते मनाला आनंद खास  

मिळते नवीन अनुभवांची आणि विचारांची रास 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची

कित्येक विश्वक्रमाची,मावळ्यांच्या बलिदानाची

लागते इथे चाहूल 

हळूहळू आणखी वळतात सह्याद्री कडे पाऊल  


वाटते बघताक्षणी सह्याद्रीच 

सुंदर रूप डोळ्यात भरावं 

प्रत्येक पावलागणिक आपल दुःख मागे सारावं 

 त्याच्या विस्तीर्ण हृदयात सामावून जावं 

इतिहासाच्या पराक्रमाची साक्ष व्हावं


 लाभते मनास अनोखी शांती आणि समाधान

 चित्तथरारक किल्ला बघतांना 

विसरल्या जाते जगाचे भान 

 सह्याद्रीचे पराक्रम आहे विलक्षण

 भ्रमण करतांना कमी पडतो एक एक क्षण  


आयुष्यात एक प्रवास सह्याद्रीचा आवर्जून करावा

 पहावा सह्याद्री,अन् अनुभवावा 

सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा 


कणखर, रौद्र, भीषण रुप त्याचे गौरवशाली 

मनामनातून नाद घुमतो आजही

शान आपली असे सह्याद्री 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract