अशी असावी कविता
अशी असावी कविता
************************
मन तरंग लहरी
काव्य मनात *रुजवी,*
भाव काव्यात येताच
कविता अशी *असावी.*
सूर ताल यमकाचा
मेळ सुरेख *असावा,*
वाचताना साद घाली
काव्यात रंग *भरावा.*
काळजाचा ठाव घेता
मन शब्दरूप *झाले,*
लेखणीची धार जणू
वाऱ्यासांगे अशी *बोले.*
भावनेला बंध नाही
सूर,ताल, *यमकाचा,*
शब्दरूपी हार जणू
सार आहे *वेदनेचा.*
---------------------------------------
