STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

4  

Rucha Rucha

Romance

कान्हा

कान्हा

1 min
366

आठवतो मला अजूनही कान्हा

तू मी अन यमुनेचा घाट

साक्ष आपल्या प्रेमाची द्यावया

नभी चांदण्यांचा शोभला थाट ।।


आठवते मला अजूनही कान्हा

चतुर्थीची धवल चांदण रात

गोपिकांच्या विळख्यात नेमका

धरलास तू माझाच हात ।।


आठवते मला अजूनही कान्हा

वृंदावनची किचकट पाय वाट

आले होते तुझ्यासाठी सावळ्या

करुनी साऱ्या संकटावर मात ।।


आठवते मला अजूनही कान्हा 

तुझ्या वेणूने भारलेली पहाट

सुरात तुझ्या नाहुन सजलेल्या

पूर्व दिशेने उधळले सप्तसूर नभात ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance