चंद्रमुखी
चंद्रमुखी
मार्गशीर्षाची पुनव
चंद्रासोबत रोहिणी
चैन पडेना गं मला
कुठं शोधू तुला राणी
रूप तुझं आरस्पानी
चन्द्रमुखी ऐन्यावाणी
चाल तुझी तुरुतुरु
सोनेरी हरणावानी
तुझ्या गोष्टी गुलूगुलू
तुझा आवाज मधुर
पायी वाजे पैंजण सुंदर
कर्णमधुर खुळखुळ
तुझी माझी गळाभेट
केव्हा होणार गं सखी
आहे देवाच्या मनात
नको करू मज दुःखी
जन्म आहे तुझा माझा
व्हावी राणी गं तू माझी
तुझ्या माझ्या लग्नाच्या गं
पंचक्रोशी करू गाजावाजा

