STORYMIRROR

Dipaali Pralhad

Romance

4  

Dipaali Pralhad

Romance

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

1 min
555

दिवसभराचं आपलं ठीक आहे 

रात्री मग खेळ चालतो जणु 

ऊन सावली कि लपंडाव 


पापण्या आसवांनी जड होतात 

भरल्या मनात तुझ्या गर्द 

आठवणी दाटून येतात 


आठवणी नव्हे त्या दाटत्या 

तूच जणु आभाळ भरुन यावं 

तसाच येतोस जश्या जेष्ठाच्या 

सरींनी सरसर यावं 


डोळे ओलावतात मन भिजतं 

आठवणींच्या गारव्यात मग स्वतःलाच मिटुन बसतं 


 

ओठांच्या किनारी मंद 

हसण्याचा स्पर्श करून जाते 


क्षणात येऊन तुला मिठी 

मारावं वाटतं ,कासावीस मनाला

मनाचा आधार द्यावा वाटतो . 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance