नात्या पलिकडचे
नात्या पलिकडचे
नात्यापालिकडचे नाते
तुझे नि माझे नाते..
भ्रमरापरी तुझे उडणे
जाग्यावरती खिळणे..
फुलण्याचे मला वेड
तुला मिटण्याची घाई..
माझे स्वप्न उडण्याचे
दवात भिजून जाई..
मला जमवण्याचा छंद
नकाे ओरबाडू मकरंद..
स्वभावा असावा धरबंध
मलाही जगू दे स्वच्छंद..

