STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance Others

4  

Gangadhar joshi

Romance Others

शिंपला

शिंपला

1 min
642

क्षीर सागरी टप्पोर शिंपला

शिंपल्या मधे माणिक मोती

प्रेमाच्या चांदण्यात अडकता

गावू लागले गाणे राती


सागर लाटा नाजूक बसता

शिंपले बघा अवचीत फाकले

स्वाती नक्षत्राचे थेंब पडता

नख शिकांत ते हासले लाजले


रातकि ड्या ची झिम्मा फुगडी

स्वर्ग सुखाची अमृत गोडी

चैत्र आंबरी शुक्रतारा

भाषा त्यांची मुकी बोबडी


असंख्य शिंपले असंख्य मोती

रात किड्यांची गाणी गाती

क्षीर सागरी ध्यानस्थ बैसले

अनादी अनंत उजळीत वाती



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance