पहाट
पहाट
दवबिंदूच्या बिल्लोरी मोतीयांचे...
ती रुपेरी वस्त्र नेसली
शाल अंगावर लपेटून धुक्याची...
ती संधीकाळी भेटली
अंथरुन चादर हिरव्या तृणावर...
ती भावनेला खेटली
उगाळीत मुलायम सर्वांग चंदनाचे...
ती अंगोपांगी चेतली
लाटा उफाळीत खाडीपार गेल्या...
ती रवी संगे पेटली
भोर अंधार सरला "पहाट" जागली...
ती सुखावून मिटली

