STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

4  

Rohit Khamkar

Romance

क्षण

क्षण

1 min
411

प्रसंग बाका असा जाहला, पडलो एकाच पारड्यात.

एकट्यापेक्षा सोबत बरी, गप्पांना झाली सुरवात.


आदरा पासून सुरू झालेली ओळख, आता विश्वासावर आली.

गोष्ट दोघांचीही सारखीच, आताच सांगितलेली नावगाव विसरून गेली.


विसरलो तर बाहेरच जगही होतो, दोघांच्या संभाषणात.

वेळच थांबवायला सांगत होतो, सारखे घड्याळाच्या कानात.


कान अजूनही काही ऐकत होते, सुटणारे तूझे बोल.

मेंदूत काहूर माजला होता, मात्र मनात वाजत होते ढोल.


सूर्य मावळती सारखा, प्रवासही परतीला लागला होता.

शेवटाची वाट बघनारा, चक्क शेवटालाच भीत होता.


भीती आपुलकीच्या नात्याची, पुन्हा भेट होईल की नाही.

आपआपल्या जगात रमलो तरी, आठवण तुझी येईलच की बाई.


सहवास तूझा लाभला, आज अचानक या प्रवासात.

काही क्षण अलगद पेरल्या गेले, आनंदाचे या आयुष्यात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance