STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Others

4  

Rohit Khamkar

Romance Others

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

1 min
1.0K

घर गाडी बंगला असावा, असावेत नोकर चाकर.

सगळ्या सुखसोयीच्या या स्वप्नामध्ये, तू सुध्दा प्रवेश कर.


बाकी सगळ तर कारन मात्र निमित्त, खास तर आहेस तूच.

तूझ्या आगमना नंतर, सगळच मिळाल काही खूप.



अपेक्षित अशीच आयुष्यात आलीस, आधी तुझी स्वप्न रंगवायचो.

स्वप्नातल्या दुनियेमध्ये, चक्क स्वप्नाशीच गप्पा मारायचो.



गप्पांना नसायचा अंत, शेवटी मी झोपमोड व्हायचो.

आठवणीत स्वप्नांच्या, पुन्हा नव्याने झोप पेरायचो.



पेरली ती खरी, तशी तू उगवलीस.

एका निर्णयावर ठाम, कायमची माझ्या सोबत उभारलीस.



जोडल्या गेलो आयुष्यभर, एका स्वप्नाच्या साक्षीने.

स्वप्नांची सत्य पुर्तता झाली, सोबत जगण्याच्या या मोक्षाने.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance