तरीही ...
तरीही ...
तू न मला पहिले
मी न तुला पहिले
सर्वस्व वाहिले ....
तरीही ...
तू न मला जाणिले
मी न तुला जाणिले
का मग जडले
प्रेम हे ....
नेत्री तुझ्या हसावे
मनी तुझ्या वसावे
जवळी तुझ्या असावे
सर्वार्थाने ...
.
तू नसताना ... मन माझे वेडेपिसे
खिन्न ,उदास , जिने होई नकोसे
स्मृती शेष भाव डोळ्यांमधूनि पाझरते
वेळी- अवेळी ...
तू नसतानाही कधी स्मरते
आठवणींचा ठिपका होते
का उगाच भाव खाऊन जाते
स्वप्नात येऊनि ....
जाणता - अजाणता मज छळते
क्षणात इथे - तिथे अवतरते
नसा - नसात भिनते ...
धमन्या होऊनि ..