Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

तुझ्यासाठी काय पण ...

तुझ्यासाठी काय पण ...

1 min
7.0K


चल गं राणी , गाऊया गाणी , जिथे नसेल दुसरे कोणी

मीच तुझा प्रेमवेडा गं , तूच माझी जीवनसंगिनी ...

जिथे नसेल प्रेमाचे दुश्मन ,तिथेच मांडूया एखादी चूल

कळत नकळत करू हवीशी भूल,काय व्हायचं ते होऊ देत ..

अंगात रग, मनात धग , करू ग थोडं वेडेपण

तूच माझी मीरा दिवानी मी तुझाच भोलापन

नाजूक - साजूक सोनकळी तू , मी प्रातःकालचे सूर्य किरण

मनासारखे जगून घेऊ , कशास मोजावे मरणापर्यंतचे उगाच अंतर

रीत- भात ,समाज -बिमाज सब झूट , समाज रीत  किस खेत की मूली, 

चल थोडासा दंगा करू , दुनियासोबत पंगा घेऊ , होऊन होऊन होणार काय

दुश्मन सारे मान्य परंतु ... हरण्याची तर नकोच चिंता जिंकू किंवा मरू

प्रेम असते सदैव पावन , माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपुले शेवटपर्यंत लढू

भातुकलीचा खेळ नव्याने पुन्हा एकदा मांडू चल , तूच माझी भुलाबाई

मी तुझा भोला पण .. मी न राजा इथला , तू हि नाहीस ग राणी

तरीही प्रजा आपुली मिळुनी दोघे सुखी ठेवू ... दुःखाचं गाणं सोबतीनं गाऊ

कडकडून भांडू कधी , मनवता कुणीही मिठीत परस्परांच्या चिंब - चिंब होऊ

तू हो नीती ,मी होतो विश्वास , माझा विकास तुझी प्रगती

मिळुनी दोघे सोबतीनं साधू , आनंदच भरू घरी - दारी ...

खेळ भातुकलीचा  नको गं, खराखुरा संसारच मांडू ,

दुधाची भूक ताकावर भागवू , कष्टाची भाकर प्रेमं खाऊ  

तू फक्त हो म्हण , करिन मी तुझ्यासाठी काय पण ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance