STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

5.0  

Dilip Yashwant Jane

Tragedy

घात

घात

1 min
2K


झळा वैशाख उन्हाच्या

किती झेलू अंगावर

सारी लक्तरे शब्दांची

कशी घालावी फुंकर


हरवत गेले शब्द

सूर पळाले अवेळी

वाटे सारे अलबेल

घात कसा सांजवेळी ?


अस्तंगत होताना रे

सारे पहात होता तू

तरी दिनकरा आज

असा शांत कसा बा तू ?


तूही फितूर झालास

आज कसा रत्नाकरा

सुराविना शब्द माझे

नवा शोधू या किनारा


सूर जुळवून पुन्हा

गाणे गाईन नव्याने

विसरून सारे काही

गात राहिल जोमाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy