सुगंधी क्षण
सुगंधी क्षण
सुगंधी क्षण
पाहताच तुला मी मीच न उरले
या सुगंधी क्षणात मी हरवून गेले
अबोल प्रीत ही डोळ्यांतूनी ओसंडली
भावना व्यक्त करण्या शब्दांची गरज नाही पडली
साथ तुझी मज हवहवीशी वाटली
एकांतात आठवण ही तुझी येतच राहिली
समोर तू असताना काहूर माजे हृदयी
नजरेला नजर भिडताच लाजून चूर होई
प्रीत तुझी माझी मोहरुन जावी
मोह-याच्या सुगंधापरी आसमंती फुलावी