STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

शिक्षक शिल्पकार

शिक्षक शिल्पकार

1 min
166

विद्यार्थ्याना गुणवत्तेपूर्ण

ज्ञानरचनावादाने शिकवू

राष्ट्राची दौलत आहेत खरी

सुसंस्कृत नागरिक घडवू ||


अंकज्ञान ,अक्षर गिरवून

माणुसकीचे मूल्य शिकवून

सृजनशील विद्यार्थी घडवून

संस्काराचे बीज रुजवून ||


तंत्रज्ञानाची नाडी जोडून

गोडी लावून विज्ञानाची

गुगलवरून ज्ञान मिळवून

भरारी आत्मविश्वासाची ||


निसर्गाचा लावणी लळा

प्लास्टिकचा वापर टाळून

रक्षण करण्या वसुंधरेचे

स्वच्छतेचा मंत्र पाळून ||


अध्यापनाशिवाय करतात

बरीच कामे अशैक्षणिक

शिल्पकार खरा शिक्षक

घडवतो राष्ट्राचे नागरिक ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational