Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

बाबासाहेब ( अभंग रचना )

बाबासाहेब ( अभंग रचना )

1 min
7.6K


माणूस म्हणून | गणतीच नाही ॥

मातृभूमी नाही | भीम बोले ॥१॥

शिक्षणाची वाट I ती सोडली नाही

जुमानला नाही I जाती भेद ॥२॥

नाशिक मंदिरी I जाऊन भिडला ॥

धर्मास नडला I समभावे ॥३॥

चवदार तळी | पाणी ओंजळीत ॥

हक्क मिळवत I लढूनिया ॥४॥

नेता दलितांचा I मानती इंग्रज॥

दोन गोलमेज | गाजविल्या ॥५॥

महात्मा घाबरी I करी उपोषण ॥

गांधी जीवदान | देवू केले ॥६॥

निवडून आले I बंगाल प्रांतात ॥

पहा संविधान I घडविले ॥७॥

हिंदू कोड बिल | मंजूर होईना ॥

त्या मंत्रीपदांना | राजीनामा ॥ ८॥

मरणार नाही I मी हिंदू म्हणून ॥

बुध्द स्विकारून I दिक्षाभूमी ॥९॥

तो महासंग्राम | बाबासाहेबांना॥

करीतो वंदना I चैत्यभूमी ॥१०॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational