STORYMIRROR

Somesh Kulkarni

Inspirational

4  

Somesh Kulkarni

Inspirational

ड्रायव्हर

ड्रायव्हर

1 min
842

स्टँडवर असतो उभा मी ओरडत गावांची नावं,

नेतो प्रवाशांना इष्टस्थळी दररोज भेटतं कुणीतरी नवं


गाडी भरेपर्यंत मात्र पाहावी लागते प्रवाशांना वाट,

एसटी नसल्यावर खूप येते याच प्रवाशांची लाट


एसटी आली पाहून उतरून घेतात काहीजण,

दुनियादारी चालूच असते आपलं काम करायचं आपण


खड्डे झाले रस्त्यावर तरी व्यवस्थित चालवावी लागते,

सरकारला दोष द्यायच्या वेळात काम केलं की आपले दोनवेळचे भागते


काही प्रवासी घालतात हुज्जत देत नाहीत पैसे,

पेट्रोलचेही वाढलेत भाव यांना कळत नाही कसे?


काही मात्र खुश होऊन टिपही देतात,

काहीजण चहानाष्ट्याला घरीही नेतात


प्रवासी असतो आपल्यासाठी देव आपण करायची त्याची सेवा,

गाडी हीच आपली लक्ष्मी, तोच आपला अनमोल ठेवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational