भग्न ( अभंग रचना )
भग्न ( अभंग रचना )
भग्न
पलंग रिकामे | जीवन देणारे I
उध्वस्त कोणीे रे ? | केले असे ॥ १ ॥
इस्पितळात या | असे काय झाले ? I
अस्ताव्यस्त केले I जीवन हे ॥ २ ॥
आपलाच हात I का हा घातपात ? |
आक्रोश का शांत ? | गुंज घाली ॥ ३ ॥
कुठे बरे गेले I असतील रुग्ण I
भासतेय भग्न | वास्तू अशी ॥ ४ ॥
होवो ते मंगल | सर्व दुःखीतांचे I
मिळो आरोग्याचे | गोड फळे ॥ ५ ॥