तुटलेली पतंग
तुटलेली पतंग
गवसणी घालती आकाशाला
पतंगाची स्पंदने
भेद घेती शाश्वतेचा
जुळती धाग्यासंगे
नको अहंकार
गगनात उडण्याचा
वाऱ्याशी सदा संघर्ष
स्वतंत्र जगण्याचा
उंच उंच उडणारे
तोंडघशी पडतील
तुटते जशी पतंग
अर्ध्यावर अडकतील
गाठली उंच शिखर पतंगाने
प्रेमाने अंतर्बाह्य चिंब झाली
मांझ्याने काट दिली तिला
जीवनाची तार यौवनातचं संपली
जमिनीचा आधार भक्कम
आनंद जसा पराकोटीचा
नाही पडण्याचे भय
नियम जसा गुरुत्वाकर्षनाचा
घ्या गरुड भरारी आसमंतात
गर्व नको कुणा हरविण्याचा
तुटलेली पतंग धरा येई
आदर असो समानतेचा
कवयित्री नालंदा वानखेडे
नागपूर