निसर्ग किमया
निसर्ग किमया
सोनेरी किरण
न्हाली ही पहाट
उजळली वाट
शिवाराची ||१||
शांत नभांगणी
ऋतूचा सोहळा
उत्सव आगळा
पर्जन्याचा ||२||
बरसला मेघ
खुलला निसर्ग
दिसे धरा स्वर्ग
मनोहारी ||३||
उधाण शेतीला
साज हा हिरवा
दागिना बरवा
मखमली ||४||
वसुधा लोभस
भासते नवरी
दिसते साजरी
सुशोभित ||५||
सुखी कास्तकार
पीक डौलदार
कष्टाचेच सार
अलौकिक ||६||