जयघोष
जयघोष
भारत देशा
मंगल देशा
वीरांच्या देशा
दुमदुमवु हे
विश्वचि अवघे
जयघोषे देशा
तुझ्या जयघोषे देशा
मंगल यान
पोचवीले ते
मंगळ ग्रहावरी
जळ स्थळ गगनी
उभी सशक्त
सेना सीमे वरी
गनीमांना त्या
मागे हटवू
मदत करु गरजूंना
ठाकू उभे
आम्ही सन्मानाने
गर्वाने देशा
झळके उंच
ध्वज हा गगनी
देशभक्ती ही
दाटली मनी
नमन करुनी
वीरांना त्या
करु तव
जयघोषा देशा
भारत देशा
मंगल देशा
वीरांच्या देशा
दुमदुमवु हे
विश्वचि अवघे
जयघोषे देशा
तुझ्या जयघोषे देशा
