असा संसार करते
असा संसार करते
असा संसार करते
दोन बालके संसारी
शाळेमध्ये नेण्यासाठी
बरी सायकल स्वारी....१
पतीदेव कामावर
त्यांचं आटोपून देते
कामधंदा घरामध्ये
दोन हाताने करते.......२
वेळ होताच शाळेची
मुलं घाई करतात
पाटी पुस्तकं दप्तरी
तेच स्वतः भरतात......३
त्यांची तयारी करून
स्वारी शाळेला निघते
सायकल वर मागे
दोघांनाही बसविते......४
आजकाल चहूकडे
फार झाले प्रदूषण
श्वास घेणे अवघड
झाले जगणे कठीण.....५
सदा बाहेर निघता
नाकी रुमाल बांधते
मुलं मागे बसलेले
त्यांना गोणीनं झाकते...६
नाही पाऊस लागत
नाही वाराही झोंबत
बाळं माझी मग दोन्ही
सुरक्षित राहतात.........७