STORYMIRROR

Somesh Kulkarni

Inspirational

4  

Somesh Kulkarni

Inspirational

अडाणी बाप

अडाणी बाप

1 min
246

वाचता येत नाही मला बसवरची पाटी,

करावी लागतात कष्टाची कामं मिळवण्यासाठी रोटी


शिक्षणच झालं नाही परिस्थिती नव्हती बरी घरची,

काबाडकष्ट करण्यातच आजपर्यंत आयुष्य घातलं खर्ची


हिशोब येत नाही मला सगळं जग फसवतं,

माझ्या अडाणीपणावर विनोद करुन कुणीतरी जगाला हसवतं


मी शिकलो नाही पण मुलांना शिकवून सज्ञान करणार,

अडाणीपणा सोडून आता ज्ञानाची कास धरणार


माझ्या नशिबी माझ्या अज्ञानामुळे आहे लाचारी,

माझ्यासारखी कितीतरी लोक असतील या जगात बिचारी


माझ्यावर आली जी वेळ ती दुसऱ्यावर येऊ देणार नाही

माझी झाली जी गत ती दुसऱ्याची कधी होणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational