कावळा ( अभंग रचना )
कावळा ( अभंग रचना )
कावळा
( अभंग रचना )
कहानी पूर्वीची I कावळा आठवे |
करून पहावे I आपणही ॥ १ ॥
खडे खडे टाकी I आणून माठात I
पाणी ना तळाला I रिता माठ ॥ २ ॥
सारी मेहनत I गेली असे वाया I
उन्हात ती काया | होरपळे ॥ ३ ॥
चोचभर पाणी | थेंब ना मिळाला |
गतप्राण झाला I तो कावळा ॥ ४ ॥
जुन्या अशा गोष्टी I ताडून पहाव्या |
मगच कराव्या I अंगीकार ॥ ५ ॥