Author Sangieta Devkar

Abstract Horror Thriller

3  

Author Sangieta Devkar

Abstract Horror Thriller

वो बुलाती हैं

वो बुलाती हैं

5 mins
230


कोण आहे काय काम आहे इतक्या रात्री तुम्ही आत कशा आल्या.?" प्रदीप अंधारात तिला बघून विचारत होता.मी कोण ..मी सुहासिनी तुम्ही कोण आणि इथे काय करता?   त्या मुलीने प्रदीप ला विचारले.अहो पण तुम्ही दार बंद असताना आत कसे आलात.?. प्रदीप.       "मी कुठे ही जाऊ शकते कुठेही ...हा हाहा हा "जोरात हसत ती मुलगी प्रदीप कडे येऊ लागली.                                                            

तिला बघून प्रदीप घाबरला,तिचे लालभडक डोळे आणि कपाळावर मोठे कुंकू ,केस सोडलेले ती हसतच प्रदीप जवळ आली आणि आपले तोंड उघडून दात ...दात नवहते ते दोन सुळे होते प्रदीपच्या मानेत खुपसू लागली.. जिवाच्या आकांतने प्रदीप ओरडला सोडा मला ...वाचवा...वाचवा..अचानक प्रदीप ला जाग आली . त्याने डोळे उघडले ,घामाने चिंब भिजला होता तो.. त्याने पटकन लाईट लावली. तर रूम मध्ये तो एकटाच होता. किर्रर्र अंधार ,रात्र किड्यांचा आवाज आणि या घड्याळयाची होणारी टिकटिक इतकाच आवाज होता. प्रदीप ला ते भयानक स्वप्न पडले होते. बाजूला असलेल्या तांब्यातुन त्याने पाणी घेऊन पिले आणि तो खिडकी जवळ आला. बाहेर पूर्ण अंधार नवहता तर थोडा चांदण्याचा प्रकाश ही होता. कदाचित आज पौर्णिमा असेल म्हणून हा उजेड आहे असा विचार प्रदीप ने केला. आणि परत बेडवर येऊन झोपी गेला. पण असलं विचित्र स्वप्न का पडले याच कोड काही त्याला सुटेना.

"सायेब लागली का झोप रात्री?"  दिनेश प्रदीप कडे सकाळी आला .हो लागली पण उशिरा पहिलाच दिवस नवीन जागा म्हणून..तुम्ही तयार व्हा मी चहा नाष्टाच बघतो . म्हणत दिनेश किचन कडे गेला.प्रदीप एक फॉरेस्ट ऑफिसर होता. एका कामा साठी त्याला या गावात काही महिन्यां साठी पाठवले होते. दिनेश प्रदीप च्या खाण्या पिण्या च बघत होता. म्हणजे या सरकारी कॉटर मध्ये कामाला होता. प्रदीप ने मुद्दाम रात्रीच्या त्या स्वप्ना बद्दल दिनेश ला काही सांगितले नाही. इतका मोठा ऑफिसर अन असा स्वप्नाला घाबरतो अशी त्याची दिनेश च्या मनात प्रतिमा झाली असती.सायेब नाष्टा तयार आहे दिनेश ने आवाज दिला तसा प्रदीप डायनिंग टेबल कडे गेला. नाष्टा संपवून तो ऑफिस ला गेला.                                                             

आठवडा झाला होता प्रदीप ला या गावात येऊन. आज रविवार होता त्यामुळे प्रदीप निवांत होता. खिडकीतून बाहेरचे दृश्य बघत उभा होता. दूरवर एक टेकडी दिसत होती. आणि तिथे एक मुलगी झाडाच्या वाळलेल्या फांद्यया गोळा करत फुल पान हात लावून बघत आपल्याच मस्तीत चालली होती. दिसायला सावळी पण नाकेडोळी छान होती. परकर पोलक असा पोशाख तिने घातला होता. टेकडी उतरून खाली आले की हे सरकारी कॉटर दिसत होते. ती मुलगी डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन खाली आली आणि तिचे लक्ष खिडकीत उभ्या असलेल्या प्रदीप कडे गेले. वाऱ्यावर तिचे केस उडत होते आणि पायातले पैंजण छुमछुम नाद करत होते. प्रदीप एकटक तिच्या कडे बघत होता. काय पावण नवीन आलात का? तिच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.अ..हो नवीन आहे कामा साठी आलोय प्रदीप म्हणाला.तिने हसून त्याच्या कडे बघितले आणि पैंजनाचा आवाज करत निघून गेली.आता रोज संध्याकाळी प्रदीप त्या खिडकीतून बाहेर बघत असायचा की ती मुलगी पुन्हा दिसेल म्हणून. पण ती काही दिसली नाही.

थोड्या दिवसांनी संध्याकाळी प्रदीप ला तोच पैंजणाचा आवाज ऐकू आला तसा तो खिडकी कडे गेला तर समोर तीच मुलगी उभी होती. ती प्रदीप ला बघून हसली आणि हाताने बाहेर ये असा इशारा केला. प्रदीप लगेच बाहेर पडला आणि त्या मुलीच्या मागे जाऊ लागला. ती पुढे पूढे जात होती अन प्रदीप तिच्या मागे. मग एका वळणावर ती मुलगी अचानक गायब झाली. प्रदीप ला समजेना की ही कुठे गेली? अंधार पडू लागला होता म्हणून प्रदीप माघारी फिरला.असेच काही दिवसांनी पौर्णिमा होती. मस्त पिठूर चांदणे पडले होते. प्रदीप जेवण करून बेडवर पुस्तक वाचत बसला होता. त्याला तोच पैजणाचा आवाज आला तसा तो उठला आणि खिडकीतून बघितले तर बाहेर तीच मुलगी हसत उभी होती. प्रदीप ही उठून बाहेर आला काय हीच गूढ आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. प्रदीप बाहेर आला आणि त्या मुली जवळ येत म्हणाला, "कोण आहेस तू आणि त्या दिवशी अचानक कुठे गायब झालीस" ?  मी कोण ? चला दाखवते या माझ्या मागे म्हणत ती मुलगी पुढे चालू लागली आणि प्रदीप भारावल्या सारखा तिच्या मागे निघाला. ती खूप वेगात चालत होती तर प्रदीप तिला गाठण्याचा प्रयत्न करायचा तितकी ती जास्त वेगाने पुढे जायची. प्रदीप तरी ही तिच्या मागे चालला होता.एक कुतूहल तिच्या बद्दल त्याच्या मनात होते. एके ठिकाणी रस्ता जरा चढती चा होता . ती पूढेच जात होती. प्रदीप ही चालत होता. चढण संपल्यावर एक दरी होती त्याच्या बाजूला ती मुलगी थांबली आणि प्रदिप कडे बघत ये इकडे ये म्हणून इशारा करत राहिली. प्रदीप ला काही तरी भारून टाकल्या सारखी त्याची अवस्था झाली होती त्यामुळे ती सांगेल तस तो वागत होता. ती आता दरीच्या एकदम जवळ उभी होती आणि प्रदीप ही उभा होता. तिने आपला हात पुढे केला तसा प्रदीप ने ही आपला हात तिच्या हातात ठेवणार इतक्यात कोणीतरी त्याला जोरात आपल्या बाजूला ओढून घेतले तसे ती मुलगी गायब झाली. सायेब अहो दरी आहे ती जीव गेला असता ना तुमचा दिनेश म्हणाला. तसा प्रदीप भानावर आला. बघा साहेब किती मोठी दरी आहे आणि तुम्ही इथे काय करता?.

ती मुलगी कुठे गेली ? तिने मला तिच्या मागे यायला सांगितले   प्रदीपसायेब ती मुलगी जिवंत नाही आणि आज पुनव ची रात्र आहे बरे झाले मी तुमच्या मागे आलो नाहीतर काय झालं असत आज. तुम्ही रूम मध्ये नवहता म्हणून बाहेर बगायला आलो तर तुम्ही एकटंच कुठं चालला होता म्हणून मी माग माग आलो.पण कोण होती ती मुलगी? आणि काय म्हणालास तू ती जिवंत नाही?चला सगळं सांगतो म्हणत दिनेश प्रदीप ला घेऊन रूमवर आला. हे पाणी घ्या अगोदर म्हणत दिनेश ने पाणी दिले.साहेब तीन वर्षा पूर्वी असच तुमच्या सारखे एक सायेब इथे बदली होऊन आले होते आणि याच कॉटर मध्ये राहिले होते. गावातली एक मुलगी सुहासिनी नाव तीच. त्या सायेबां च्या प्रेमात पडली. सायेब पण तिच्या वर प्रेम करत होते. वर्ष भर सायेब इथे होते. सुहासिनी आता सायेबा च्या मागे लागली होती की लग्न करूया म्हणून. मग सायेब बोलले तिला की ते त्यांच्या घरच्यांना सांगून पुन्हा या गावात येतील आणि मग आपण लग्न करू. पण सायेब काय परत आलेच नाहीत. सुहासिनी ने लई वाट बघितली सायेबाची आणि ती पोटुशी होती. गावात आता चर्चा होऊ लागली आणि सुहासिनीच पोट भी दिसू लागलं मग सुहासिनी घरा बाहेर पडतच नवहती. आणि एक दिवस पुनव च्या रातीला त्या दरीत सुहासिनी न जीव दिला. आता तुम्ही जिच्या माग गेला ती तीच होती. दर पुनव रात्री ला ती इथे आजूबाजूला दिसते अस लोक म्हणतात. या कॉटर कड येऊन ती सायेब आले का याची वाट बघते अस गावाची लोक म्हणतात पण ते खरच आहे. आज पुनव रात्र आहे म्हणून तुम्हाला सुहासिनी दिसली आणि तुम्हीच ते सायेब म्हणून तुम्हाला घेऊन ती दरी जवळ गेली आणि तुमचा जीव घेणार होती. कारण त्या साहेबांनी तिला फसवले होते. त्याचा बदला घेणार होती. इथून पुढं लक्षात ठेवा सायेब पुनव च्या रातीला बाहेर पडू नका.

प्रदीप ला हे ऐकून विश्वासच बसत नवहता पण त्याने तिला बऱ्याच वेळा बघितले होते म्हणजे दिनेश म्हणतो ते खर असेल ही. मग त्याने या आधी ही ती मुलगी स्वप्नात आलेली आणि खिडकी बाहेर दिसली होती हे प्रदीप ने दिनेश ला सांगितले.अहो सायेब परत अस तिच्या मागे नका जाऊ उगा जीव गमवून बसाल. दिनेश म्हणाला.प्रदीप ने मग त्या नंतर त्या मुली कडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि लवकरात लवकर ते गाव सोडले.


समाप्त. #थरारक भयकथा स्पर्धा 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract