सहजीवन (भाग ७)
सहजीवन (भाग ७)


एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोद ला नीट बोलता ही येत नसे. रवी रोज घरी यायचा शलाका ला काय हवे नको पाहायचा. शलाका बद्दल त्याला खूप वाईट वाटतं असे.जमा असलेला सगळा पैसा प्रमोद च्या उपचारासाठी खर्च झाला होता . आता घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न शलाका समोर उभा होता. ती रवी सोबत या वर बोलली तसा रवी म्हणाला मी माझ्या ओळखी ने बघतो कुठे काही नोकरी तुम्हाला मिळेल का? एका प्राथमिक शाळेत शलाका सुरवातीला ट्रेनी शिक्षिका म्हणून कामाला लागली . आता घरचे सगळे काम करून ती शाळेत यायची. संकेत प्रमोद ला मदत करत असायचा. दुपार पर्यंत शलाकाची शाळा असायची मग ती घरी आली की प्रमोद कडे लक्ष द्यायची. रवी घरी आला की शलाका ला ही बरे वाटायचे आपले सुख दुःख त्याला सांगून मन हलके करायची एक चांगला मित्र या नजरेनेच ती रवी कडे पाहायची. प्रमोद ला मनातून वाटत असायचे की आपण हिला अजिबात सुख नाही दिले सतत तिचा पाण उतारा केला पण शलाका मात्र एका पत्नीचे कर्तव्य नेटाने पार पाडत होती. याची सल कुठे तरी प्रमोद ला आतून खात होती. तो शलाकाचा हात हातात धरून बरेच वेळा रडत असे त्यातूनच शलाका ला जे समजायचे ते समजत होते. ती त्याला नेहमी धीर देत असायची पण इतका पैसा खर्च करून ही शेवटी प्रमोद बरा नाही झाला. एक दिवस झोपेतच त्याचे निधन झाले. आता सानू आणि संकेत कॉलेज ला जात होती. शलाकाला शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती. सगळं व्यवस्थित सुरू होते. एक दिवस रवी घरी आला आणि त्याने शलाका ला सांगितले की त्याच्या बायको ला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे. रवी च्या सुखी संसाराला ग्रहण लागले होते तो खूप दुःखी झाला होता शलाकाने त्याला समजावले की चांगल्या डॉक्टर कडे उपचार कर तिला काही ही होणार
नाही. त्याच्या बायको चे शेवटी ऑपरेशन करण्याचे ठरले पण ऑपरेशन म्हणावे तितके यशस्वी नाही झाले शेवटी निर्मला हे जग सोडून गेली. रवी पुरता कोसळून गेला पण शलाका ने त्याला आधार दिला. कालांतराने रवी च्या मुलीचे योग्य मुलाशी लग्न झाले. इकडे सानू चे ही लग्न झाले. संकेत चे शिक्षण संपून तो ही नोकरी करत होता त्याच पूजा वर प्रेम होतं त्याने तसे शलाका ला सांगितले मग त्या दोघांचे ही लग्न उरकून घेतले. शलाका आता सगळ्या जबाबदारी तुन मुक्त झाली होती . स्वहता कडे लक्ष देत होती. आपल्या आवडी निवडी जपत होती. रवी कायम शलाका कडे येत असायचा. मुलं ही त्याला काका म्हणत सगळं काही शेयर करायची सल्ला घ्यायची. रवी म्हणजे जणू त्यांच्या घरातला एक सदस्य असाच झाला होता. पण पूजा घरी आली आणि तिला ही गोष्ट खटकू लागली. मग तिने संकेत चे कान भरायला सुरवात केली. शलाका हे सगळं जाणून होती पण जोपर्यंत संकेत काही बोलत नाही तोपर्यंत हा विषय काढायचा नाही असे तिने ठरवले पण आज हा विषय निघालाच. म्हणून ती म्हणाली की तुम्हाला आवडत नाही तर रवी पुन्हा या घरात येणार नाही. संध्याकाळी नेहमी प्रमाणे सानू चा फोन आला. तिने आई च आयुष्य जवळून बघितले होते. बाबा नी तिला कसा त्रास दिला किती अपमान केला हे ती जाणून होती म्हणून ती कायम आई च्या बाजूने ठाम उभी होती. रोज फोन करून तिची चौकशी करायची. आज आई चा मूड बिघडला आहे हे तिला लगेचच समजेल. आई काय झाले तू शान्त का आहेस? काही नाही सानू मी ठीक आहे ग. नाही आई काही तरी आहे जे तू लपवते आहेस बोल सानू म्हणाली मग शलाका ने संकेत आणि पूजा चे बोलणे तिला सांगितले. ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानू ने फोन ठेवला.
(क्रमशः)