Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

सहजीवन (भाग६)

सहजीवन (भाग६)

2 mins
221


नवरा व्यभिचारी आहे हे माहीत असून ही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो या सारख दुसरं दुर्दैव काय असू शकते? शलाका बराच वेळ विचार करत होती.अशातच तिला तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची चाहूल लागली. सानू दोन वर्षांची होत आली आणि संकेत चा जन्म झाला. शलाका आता घरकाम आणि दोन मुलं यातच गुरफटून गेली. प्रमोद मात्र नेहा कडे जास्तच आकर्षित होत गेला. ते दोघे आता बिनधास्तपणे फिरत असायचे भेटत ही असायचे.शलाकाच्या प्रेग्नन्सी मुळे प्रमोद तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असायचा. नेहा मात्र प्रमोद कडून भरपूर गिफ्ट्स आणि पैसे ही उकळत राहायची. प्रमोद तिच्या साठी वेडा झाला होता. शलाका समोर तो आता नेहाशी फोन वर बोलायचा त्याच आणि नेहाच अफेअर आहे हे शलाकाला माहीत झाले होते. त्याला आपल्याला बायको आणि दोन मुलं आहेत याचे ही भान राहिले नवहते. पण म्हणतात ना अति तिथे माती तसच काहीसं प्रमोद च्या बाबतीत ही झाले. सानू आता 15 वर्षांची झाली होती. तिला वडिलांचे वागणे आई ला दुय्यय स्थान देणे या गोष्टी खटकत होत्या पण ती काही बोलली तर प्रमोद तिला ही ओरडायला किंवा तिच्या वर हात उगारायला कमी करत नसे. मग शलाका सानू ला च गप बसवत असे. संकेत ही तेरा वर्षाचा होता त्याला ही सगळ समजत होते पण वडिलांना पुढे गप्प बसावे लागत होते. एक दिवस प्रमोद च्या ऑफिसमधुन रवी चा फोन आला की प्रमोद ला चक्कर आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. शलाका मग रिक्षा करून त्या हॉस्पिटलमध्ये गेली. प्रमोद ला पॅरलेसिस चा अटॅक आला होता. त्याची उजवी बाजू पूर्णपणे पॅरलाईज झाली होती. आठवडा भर प्रमोद हॉस्पिटलमध्ये होता. रवी शलाका ला लागेल ती मदत करत होता. प्रमोद ने बऱ्या पैकी रक्कम पी एफ मध्ये ठेवली होती तीच काढून त्याच्या हॉस्पिटल चा खर्च भागवला. नेहा वर त्याने बरेच पैसे खर्च केले होते.प्रमोद घरी आला पण आता तो झोपूनच होता. शलाका ला त्याच सगळं काम करावे लागत असे. प्रमोद यातून बरा होईल की नाही काहीच माहीत नवहते. रवी च्या माहितीतील एक माणूस रोज प्रमोद ला मालिश करायला येत असे. जवळ जवळ महिना झाला पण नेहा एकदा ही प्रमोद ला भेटायला आली नाही. एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोद ला नीट बोलता ही येत नसे. रवी रोज घरी यायचा शलाका ला काय हवे नको पाहायचा. शलाका बद्दल त्याला खूप वाईट वाटतं असे.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract