Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

सहजीवन (भाग ५)

सहजीवन (भाग ५)

6 mins
194


बायको ही फ़क्त घरकाम करायला आणि सव्हताला हवे तेव्हा हवे तसे शरीर सुख भोगायला असते हिच प्रमोद ची मानसिकता होती. त्या शरीर सूखात हळूवार पणा ,आपलेपना कधीच नसायचा मग तिला काय हवे किंवा वाटते याचा प्रश्नच येत नव्हता. प्रमोद ला फ़क्त तिच्या कडुन घेण माहित होत देण नाही. आता ही स्त्रियां सव्हताला काय हवे ? शरीर संबधात त्या समाधानी आहेत का य्या बद्दल बोलत नाहीत त्या काळी तर या वर बोलने म्हणजे पापच जणु! समजा एखादी स्त्री नवऱ्या कड़े मन मोकळे पनाने बोललीच तर मग तिला हे सगळ कस माहित ? हिचे बाहेर तसे संबध आहेत का? असा विचार त्याच्या मनात येऊ शकतो त्यामुळे आपल्या कड़े बायका सहसा शरीर सूखा बाबत काहीच बोलत नाहीत. नवरा वागेल तेच ठीक म्हणत त्याला साथ देतात.

   शलाका आज पहिल्यांदाच एकटी घरी होती थोड़ी भीती वाटत होती तिला पन काही वाटले तर रवि आहे ही खात्री होती. कुठेतरी आपसुक आज ती तीच स्वातंत्र्य अनुभवत होती. सानु ला झोपवून ती ही झोपी गेली. सकाळी ही ती एकदम फ्रेश मुड़ मध्ये उठली सानु च सगळ आवरून घर काम करत राहिली. अचानक सानु जोरजोरात रडु लागली . सानु नुकतीच एक वर्षाची झाली होती त्यामुळे ती का रड़ते हे शलाका ला समजेना तिने सानु ला जवळ घेतले खावू घालन्याचा प्रयत्न केला पण तरी ही ती शान्त होत नव्हती. शलाका ला सुचेना की काय करावे तिने मग रवि ला फोन केला त्या काळी लैंड लाइन फोन होते.रवि ऑफिस ला निघालाच होता . तो बोलला मी येऊन जातो घरी. सानु रडायची थांबत नव्हती. थोड्याच वेळात रवि आला. शलाका ने सांगितले की सानु रड़ते आहे काय झाल काहीच समजत नाही. रवि मग शलाका ला घेऊन डॉक्टरां कड़े आला. सानु चे पोट दुखत होते तिला औषध तिथेच दिले. घरी येईपर्यंत ती झोपुन गेली. भावुजी तुम्हाला माझ्या मुळे ऑफिस ला लेट झाला. अस काही नाही वहिनी थोड़ा लेट चालतो.मग शलाका ला सानु ची काळजी घ्यायला सांगून तो ऑफिस ला गेला. संध्याकाळी प्रमोद चा फोन आला. तेव्हा तिने सानु बद्दल त्याला सांगितले रवि आला होता हे ही बोलली. ठीक आहे मी उद्या येतो म्हणत त्याने फोन ठेवला. प्रमोद सोबत नेहा ही होती. ते पहिल्यादा असे बाहेर आले होते त्यामुळे नेहा ने हॉटेल मध्ये वेगळी रूम घेतली होती पण फ़क्त रात्र सोडता ती बाकी वेळ प्रमोद सोबतच होती. त्याच्या पैशाने तिने सव्हता साठी खरेदी केली. प्रमोद तिच्या साठी काही ही करायला तयार होता पण नेहा स्वार्थी होती ती त्याच्या शी अंतर ठेवूनच वागत होती. पुरुषाला कसे नादी लावायचे हे तिला चांगले माहित होते. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जाताना रवि शलाका कड़े आला. सानु कशी आहे बघायला. चहा घेवून तो ऑफिस ला गेला. शलाका साठी त्याने वाचायला पुस्तके ही आणली होती . ती तिला दिली. रवि खरच अगदी निस्वार्थी माणुस होता. शलाका आपल्या मित्राची बायको या नजरेच तो तिच्या कड़े बघायचा. रवि तसा आहे म्हणूनच प्रमोद ला यात काही गैर वाटत नव्हते. शलाका ला ही रवि चा स्वभाव आवडला होता. ती ही त्याला आदराने पाहत होती. रात्री प्रमोद घरी आला. सानु कशी आहे विचारले बस्स बाकी त्याला पाहिली मूलगी झाली याचे त्याला वाईट वाटत असे पण आता तो बाप होता म्हणून मुलीची जबाबदारी झटकू शकत नव्हता. रात्री तो शलाका वर तूटून पडला. त्याला शलाका मध्ये आता नेहा दिसत होती म्हणून तो अजुनच तिला ओरबाडत होता. शलाका मात्र निपचिप पडून त्याचा अत्याचार सहन करत होती. तिला वाटले दोन दिवसांनी नवरा भेटतो आहे तर जरा बोलत बसेल हळूवार आपल्याला फुलवत राहिल . प्रेमाच्या गोष्टी करेल पण हे सगळ प्रमोद च्या गावी ही नव्हते. त्याला पति पत्नी च्या नात्या मध्ये फ़क्त एकच नात दिसत होत ते म्हणजे नर आणि मादी ! प्रमोद आणि नेहा आता जास्तच एकत्र राहत होते. ऑफिसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असे. रवी ने एकदा प्रमोद कडे हा विषय काढला तर तो म्हणाला,आमच्यात फक्त मैत्री आहे पण लोकांना सगळ्याच गोष्टीत काळंबेर दिसत त्याला मी काय करणार? नेहा माझ्या शी जास्त बोलते ते ऑफिसमध्ये कोणाला आवडत नाही हे समजते मला. प्रमोद अरे ती नेहा तुझ्या शी गोड बोलून तुझा पैसा उधळते हे तुला दिसत नाही का? रवी मला समजते माझ्या साठी काय चांगले आणि काय वाईट. या वर रवी काहीच बोलला नाही. प्रमोद आणि नेहा सतत बाहेर फिरायला जायचे . ऑफिस च्या कामा निमित्त बाहेर गावी ही जायचे. प्रमोद आता नेहा आणि शलाका मध्ये तुलना करत असे. प्रमोद अलीकडे घरी उशिरा येत असे. शलाकाने एकदा विचारले तर म्हणाला काम असतात मला मी काही बाहेर भटकत नाही. आणि घरी येऊन काय तुझं तोंड बघू . शलाका ने मग त्याला काही ही विचारायचे नाही असं ठरवले. एका रविवारी प्रमोद शलाका ला म्हणाला आज आपल्या कडे जेवायला माझी मैत्रीण म्हणजे नेहा आणि तिचे मिस्टर येणार आहेत चांगला स्वयंपाक कर. रात्री नेहा आणि तिचा नवरा दीपक प्रमोद कडे आले. नेहा छान मेकअप करून सिव्हलेस ब्लाउज पातळ साडी घालून आली होती. सुंदर दिसत होती. तिच्या पुढे तिचा नवरा दीपक काहीच नवहता. अगदी किरकोळ आणि दिसायला जेमतेम चेहऱ्यावरूनच गरीब वाटत होता. प्रमोद ने नेहा कडे बघून स्मित केले आणि हाताने छान दिसतेस असा इशारा केला. तसे नेहा ही त्याच्या बघून हसली आणि हाताने हळूच फ्लायिंग किस दिले नेमके हे करताना शलाकाने नेहा कडे बघितले तसे तीने दुसरीकडे नजर वळवली. जेवताना ही प्रमोद नेहा ला आग्रह करून करून जेवू घालत होता. त्यांच्या कडे डायनिंग टेबल होता. प्रमोद नेहा मग तिच्या बाजूला दीपक असे जेवायला बसले होते. शलाका सानू ला भरवून मग जेवत असे. शलाका त्यांना जेवण वाढत होती.सानू रडू लागली म्हणून ती तिच्या कडे गेली आणि सानू ला चटई वर बसवून काही खेळणी तिच्या समोर ठेवली. हॉल मधून किचन सहज दिसत असे शलाकाचे लक्ष समोर गेले तर नेहा आपला पाय प्रमोद च्या पाया वरून फिरवत असताना तिला दिसली. नेहा आणि प्रमोद च्या वागण्या बद्दल तिला जरा मागेच संशय आला होता . आता हे दृश्य बघून तिला खात्री पटली की या दोघांचे काहीतरी चालू आहे. त्या तिघांची जेवणे झाली. वहिनी खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही खूप छान झालं होतं सगळं नेहा बोलत होती. मग नेहा आणि दीपक जायला निघाले. त्यांना बाहेर पर्यंत सोडून प्रमोद घरी आला. शलाका जेवत होती पण डोळ्यासमोर मघाचे चित्र होते. तिला आतून खूप वाईट वाटतं होते. खूप रडू ही येत होते. पण ती कसे बसे स्वहतावर संयम ठेवून होती. रात्री सगळं आवरून ती झोपायला आली. याला नेहा बद्दल विचारावे का ? पण आपल्या कडे तसा काही ही पुरावा नाही मग हा का मान्य करेल की त्याच्यात आणि नेहात तसे संबंध आहेत ते? असा विचार ती करत होती. प्रमोद ने तिला आपल्या जवळ ओढले तिला आता त्याचा स्पर्श ही नकोसा वाटत होता पण तिचा नाईलाज होता. तो अधाशा सारखा तिच्या वर तुटून पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण रात्रीच्या त्या अंधारात त्याला फक्त त्याची वासना पुर्ती करायची होती. मना सारखे तिला ओरबाडून तो शान्त झाला आणि तिच्या कडे पाठ करून झोपी गेला. शलाकाचे अश्रू मात्र वाहतच चालले होते. शरीराने आणि मनाने ही ती सुन्न झाली होती. नवरा व्यभिचारी आहे हे माहीत असून ही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो या सारख दुसरं दुर्दैव काय असू शकते? शलाका बराच वेळ विचार करत होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract