Author Sangieta Devkar

Abstract Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Romance

सहजीवन (भाग ३)

सहजीवन (भाग ३)

3 mins
151


त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्या सोबती. कधी त्याच्या मनात आले तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा पण फार कमी. घरी त्यांच् सगळ निट नेटके आणि वेळेत सगळ ती करायची नाहीतर त्याचे बोलने ऐकून घ्यावे लागायचे. लग्न करून ही म्हणावे तसे सुख समाधान शलाका ला मिळाले नव्हते. माहेरी; तिला जास्त तो पाठवत नसे. सव्हता दीसायला तिच्या पुढे कमीच होता म्हणुन शलाका बाबत तो जास्त; सव्हताला अन सेक्यूर फील करत होता. लोकां समोर ही तिचा पाण उतारा तो सहज करायचा. असच शलाकाच आयुष्य सुरु होत आता जे जस आहे तस स्वीकारण्या शिवाय तिच्या कडे पर्याय नवहता. मग सानिका चा जन्म झाला तिच्या बाल लिलात शलाका गुंग होऊन गेली. आता शलाकाला घर काम आणि सानिका मधून स्वहता साठी वेळ ही मिळत नवहता. प्रमोद मग अजूनच तिच्या वर चिडचिड करत असे ती रात्री बेडरूममध्ये आली की तशीच घरच्या कपड्यात असायची तिच्या साडी ला मसाल्याचे वास,सानिका च्या दुधा आणि दुप्पटयांचा वास त्याला नकोसा वाटे. त्यात रात्री अपरात्री सानू रडत उठायची मग त्याची झोपमोड व्हायची. अशात पण प्रमोद आपला पुरुषी नवरे पणाचा हक्क गाजवायचा. स्वहताला हवं तसं तिच्या कडून ओरबाडून घ्यायचा. शलाका निदान झोपताना तरी साडी बदलत जा म्हणून तिला ओरडायचा. अहो मला वेळच मिळत नाही त्यात मी काम करून दमून जाते अस ती बोलायची. ती किती ही दमलेली असो त्याला इच्छा झाली की तिने न तक्रार करता त्याला स्वहताला समर्पित करायचे . प्रमोद च्या ऑफिसमध्ये नवीन ज्युनियर अकौंटट म्हणून नेहा जॉईन झाली. दिसायला छान नाजूक नेहमी चापून चोपून साडी नेसणारी,गळयात छोटं मंगळसूत्र,केसात भांगेत कुंकू ,ओठांवर हलकी लिपस्टिक अशी नेहा सगळ्याचे लक्ष वेधून घ्यायची. प्रमोद तिचा सिनियर होता त्याच्या अंडर नेहा ला काम करायचे होते. प्रमोद ही नकळतपणे नेहा कडे बघत असे. सगळ्याशी ती हसून बोलत असे. ही किती टापटीप आणि छान राहते नाहीतर शलाका गबाळ ध्यान नुसते अस त्याच्या मनात येत असे. आज प्रमोद चा वाढदिवस होता. खूप दिवस झाले त्याचा मित्र रविकांत त्याच्या कडे पार्टी मागत होता. लग्न झाल्याची पार्टी अजून पेंडिंग होती. मग आज च्या निमित्ताने प्रमोद ने ऑफिस स्टाफ ला पार्टी देण्याचे ठरवले. सानू झाल्या नंतर घरी वर कामाला बाई लावली होती. प्रमोद ने शलाका ला सांगितले की संध्याकाळी ऑफिस चे काही लोक घरी जेवायला येतील बाई ला मदतीला घे आणि छान स्वयंपाक कर. शलाका ने मग सगळी तयारी करून ठेवली. ती ही तयार झाली . प्रमोद घरी आला. सगळा स्वयंपाक आणि घर ही शलाकाने छान तयार ठेवले होते. ठरलेल्या वेळी ऑफिस स्टाफ प्रमोद च्या घरी आला एकूण सात आठ जण होते. रविकांत आणि नेहा ही आली होती. प्रमोद ने सगळ्याची शलाका सोबत ओळख करून दिली. खास करून नेहा ची जास्त ओळख करून दिली ही माझी ज्युनियर आहे नेहमी ऑफिस ला व्यवस्थित येते कामात पण हुशार आहे असं बोलला. शलाका फक्त नेहा कडे बघून हसली. सगळ्यानी जेवण केले केक कापला. रवी बोलला वहिनी स्वयंपाक खूपच छान झाला आहे. तुमच्या हातात जादू आहे. प्रमोद ला शलाकाचे केलेले कौतुक इतकं काही आवडले नाही. तो बोलला अरे रवी ती घरीच असते ना मग स्वयंपाकात हुशार असणारच ना? रवी ला हे त्याचं बोलणं नाही आवडले त्याने शलाका कडे बघितले तिचा चेहरा उतरला होता. प्रमोद तिला कशी वागणूक देत असेल हे त्याला समजून चुकले. रवी प्रमोद चा खास असा मित्र होता त्यामुळे तो त्याला जास्त काही नाही बोलू शकला. प्रमोद नेहा ला काय हवे नको सगळं जातीने बघत होता. नेहा ला अटेन्शन हवेच असायचे मग तो पुरुष कसा ही असो आपल्या समोर पुढे पुढे करतो ना मग झालं तर अशी तीची वृत्ती होती. आपलं काम साधून घ्यायला गोड कस बोलायचे हे तिला चांगले माहीत होते.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract