सहजीवन (भाग ८ अंतिम)
सहजीवन (भाग ८ अंतिम)
शलाका ने संकेत आणि पूजा चे बोलणे तिला सांगितले. ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानू ने फोन ठेवला. दोन दिवसांनी सानु आई कड़े आली. संकेत आणि पूजा ला तिने बाहेर बोलवले मला तुम्हा दोघां शी काही बोलायचे आहे . काय काम आहे का सानु माझ्या कड़े संकेत ने विचारले. नाही पण थांब थोडा वेळ समजेल तुला अस बोलून सानु ही बसली. दाराची बेल वाजली शलाका दार उघड़ायला गेली. दारात रवि होता. अरे तुम्ही आत या म्हणत शलाका बाजूला झाली.रवि ला बघुन पूजा चा चेहरा पडला. सानु म्हणाली संकेत तुला आणि पूजा ला रवि काका च घरी येण आवडत नाही हो ना? तसे काही नाही सानु पन लोक उगाच चर्चा करतात म्हणुन . संकेत आयुष्य आपल असते रे ते लोकांच्या मता नुसार जगायचे की आपल्या मना नुसार ते आपणच ठरवायचे असते. मग सानु रवि कड़े बघत म्हणाली, काका तुम्ही आणि आई ख़ुप चांगले मित्र आहात हे मला माहित आहे. तुमची मैत्री कीती स्वच्छ आणि निरागस आहे हे ही मी जाणते पण काही लोकांच्या नजरेत तुमची मैत्री खटकते. मग सानु असे असेल तर मी तुमच्या घरी येण बंद करेन उगाच माझ्या मुळे शलाका वहिनी ना त्रास नको. नाही काका त्रास काही नाही. पन मला सांगा आई आणि तुम्ही चांगले मित्र आहात तर या मैत्रीला नात्याचे लेबल लावले तर ते जास्त चांगले होईल अस मला वाटते. म्हणजे काय सानु मी नाही समजलो रवि म्हणाला. काका माझी अशी इच्छा आहे की आई आणि तुम्ही लग्न करावे आणि एकत्र आयुष्य घालवावे आई ला बाबा नी किती त्रास दिला हे मला चांगल
े माहित आहे. पण तुम्ही वेळोवेळी आई च्या पाठीशी एक मित्र म्हणून क़ायम उभे रहिलात. आता तुम्ही दोघे ही एकटे आहात तर मग दोघे एकत्र आलात तर आई ला आता तरी सुख मिळेल. तुम्ही दोघांनी माझ्या बोलण्याचा विचार करावा असे मला वाटते . तुम्ही दोघे ही एकाकी आहात समदुःखी अहात. तुम्ही लग्न केले तर लोकांना ही बोलायला तोंड नसेल मग. संकेत तुला काय वाटते सानु ने विचारले. आई ची इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही . आई तू निट विचार कर आता या वयात तुला कोणाची साथ मिळाली तर मला ही तुझी काळजी राहणार नाही. रवि काका सोबत तू नक़्क़ी आनंदात राहशील. काका तुम्ही ही माझ्या बोलनयाचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. सानु मी विचार करेन मग सांगेन तुला रवि म्हणाला.आता पूजाला बोलायला जागाच नव्हती. शलाका आणि रवि भेटले पूर्णपणे विचार करून मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सानु ख़ुप खुश झाली. आई ने दुखच सोसले निदान आता तरी ती आनंदात राहिल . रवि ने ही आपल्या मुलीला आपले मत सांगितले ती ही आनंदाने या लग्नाला तयार झाली शलाका ला ती लहान असल्या पासून ओळखत होती. मग एक दिवस ठरवून शलाका आणि रवि ने रजिस्टर मॅरेज केले. रवि आणि शलाका आनंदी होते. शलाका अधूनमधून संकेत कड़े यायची तर रवि च्या मुलीला हक्काची आई आणि माहेर मिळाले होते. शलाकाच्या आयुष्याचे दुख चक्र संपून आता सुखाची सुरवात झाली होती.आता कुठे खऱ्या अर्थाने शलाका च्या सहजीवनाला सुरवात झाली होती.
समाप्त