माझं कोल्हापूर
माझं कोल्हापूर


माझे आवडते ठिकाण जिथे मला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते ते आहे माझे शहर कोल्हापुर! माझ माहेर शांत आणि नयनरम्य अस हे कोल्हापुर. कला आणि कलाकारांची नगरी.तिथले वातावरणच इतके सुंदर आहे की माणुस आपोआप त्या जागी प्रसन्नता अनुभवतो. कदाचित आई अंबाबाई चा वरदहस्त शहराला लाभला आहे म्हणुन असेल तिथे ख़ुप सकारात्मक ऊर्जा प्रत्येकालाच जाणवते. इथे पुण्याच्या गर्दी ,गोंगटा पासुन निवांतपणा जेव्हा हवा असेल तर मी कोल्हापुर ला जाण पसंद करते. एकदम शान्त आणि उल्हासित मन तिथे गेल्यावर होते. तिथले साधे जेवणही ख़ुप रुचकर लागते. आपुलकी ने विचारपूस करणारे शेजारी,आणि रिक्षा वाला ही आपलेपणा ने गप्पा मारतो तेव्हा जाणवते की अजुन ही दुनियेत प्रेम,जिव्हाळा आणि मानुसकी टिकून आहे. कुस्ती,चित्रपट,लावणी ,नाटक़ यांची पंढरी म्हणजे कोल्हापुर! अनेक लेखक,कवी,अभिनेते,याच मातीत जन्मले. कलेचा वारसा या शहराला लाभला आहे. अनेक दुखा वर मात मी या माझ्या गावात केली. या माझ्या गावाने मला पुन्हा उभे राहान्याचे बळ दिले आहे. जेव्हा जेव्हा निराशा मना वर आरूढ़ झाली तेव्हा तेव्हा कोल्हापुर नेच मला सावरले आहे. माझ दुख हलक केले आहे. या वातावरणातच एक प्रसन्नतेची आणि आनंदाची लहर आहे. कोणी ही पाहुणा इथे येवो तो इथे रमुन जातो. त्याला कोल्हापुर आपल वाटू लागते. इथे भरभरून जगण्याची उर्मी आहे.आपुलकीचा,माये चा स्पर्श आहे. इथे भावनांचा ओलावा आहे,इथे पाठीवर पडनारी कौतुकाची थाप आहे. इथे जितके तिखट खाल्ले जाते त्याच्यां दुप्पटी ने इथल्या माणसां मध्ये गोड़वा जास्त आहे. इथे कधीही कोणाला एकट आहोत हे फील होत नाही तर एकटया माणसाला ही जीव लावतात ते आहेत कोल्हापुरकर! जरी आमची भाषा रांगड़ी,खेडवळ असो पण आमच मन एकदम शुद्ध ,निर्मळ आहे. बोलनयात गोड़वा आहे आणि जगन्यात उत्साह आहे. कीती ही संकटे येवू दे हे शहर कोलमडुन नाही पडणार कारण हातात हात देणारे इथे लाखो आहेत. माझी ऊर्जा माझी सकारात्मकता म्हणजे माझ कोल्हापुर. मी या मातीत जन्मले याचा मला अभिमानाच आहे. दूसरा जन्म मला मिळाला तर तो कोल्हापुरात च मिळावा ही आई अंबाबाई च्यां चरणी प्रार्थना. "
ही माती लाल आभाळी गुलालही माती लाल आभाळी गुलालकाय पावन, हाय का खुशाल?माणुसकीची ओल काळजातले हे बोलही, माणुसकीची ओल काळजातले हे बोलहा नाद खुळा लावी लळाकितीबी जावा दुर ..कोल्हापूर, कोल्हापूर कोल्हापूर, माझं कोल्हापूर...