Author Sangieta Devkar

Drama

3.5  

Author Sangieta Devkar

Drama

मंजुळा (भाग ५ अंतिम)

मंजुळा (भाग ५ अंतिम)

3 mins
81


मंजू हे जे आपल्यात घडले ते अनवधानाने झाले खर तर माझंच चुकले मी स्वतःला आवरायला हवे होते. "साहेब अस नका बोलू यात माझी पण तेवढीच चूक आहे पण जे झालं  ते खरच खूप सुंदर होत एक गोड स्वप्न होत असच मला वाटलं. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी ही गोष्ट कोणाला ही बोलणार नाही माझ्या वर विश्वास ठेवा. हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन. "मंजू तू खरच खूप साधी आणि स्वच्छ मनाची आहेस, मला माफ कर. भविष्यात तुला कसली ही मदत लागली तर मला हक्काने सांग मी तुझ्या एका हाके वर येईन. " मंजू ने प्रेमाने सुदेश ला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात आधार,विश्वास होता.

मंजू घरी आली ती खूप आनंदात होती. ते क्षण एका स्वप्ना सारखे ती कायम जपून ठेवणार होती. मंजू आणि तीच काम अस रुटीन चालू होते. सुदेश कडे ही जात होती. महिना झाला आणि मंजू ची पाळी चुकली. कामाच्या नादात तिला समजलेच नाही दुसऱ्या महिन्यात तिच्या लक्षात आले. ती खूप खुश झाली . आपल्याला नक्की दिवस गेले असणार या भावनेने सुखावली. तिला सुदेश सोबतचा तो प्रणय आठवला याचा अर्थ हे मूल त्याच होत? ज्या अर्थी इतके दिवस तिला दिवस नाही गेले आणि आताच पाळी चुकली म्हणजे नक्की हे मुल सुदेशच च आहे. पण असो आपण आई होणार या पुढे तिला बाकी गोष्टी गौण वाटू लागल्या. तीन महिने उलटून गेले तसे तिने सासू ला आणि नवऱ्याला सांगितले की ती आई होणार आहे. ते दोघे ही खुश झाले. आता मंजुच पोट जरा जरा दिसू लागले होते. कुंदा कडे ती कामाला येतच होती. कुंदाच्या चाणाक्ष नजरेने तीच वाढलेले पोट ओळखले. " मंजू तुला दिवस गेले का ग ? पोट दिसू लागले आहे तुझं .मंजू क्षणभर दचकली मग कुंदा जवळ येऊन म्हणाली, हो ताई . "पण हे कसे झाले? तू नवऱ्याला कुठे दाखवले होते का डॉक्टर कडे?नाही ताई पण तुम्हाला एक सांगू का ?बोल काय सांगायचे आहे?ताई आधी मला वचन द्या की मी जे सांगणार ते तुम्ही बाहेर कोण जवळ नाही बोलणार. ताई माझा विश्वास आहे तुमच्यावर म्हणून हे सांगायचे धाडस करते.  मंजू हात जोडून म्हणाली.बोल मी कोणाला काही नाही सांगणार कुंदा म्हणाली.मग सुदेश कडे कामाला लागल्या पासूनच्या सगळ्या घटना मंजू ने कुंदा ला सांगितल्या. "ताई आमच्यात जे झालं ते त्या क्षणाला भाळून झालं. यात चूक बरोबर पाप पुण्य हे काही मला नाही माहीत पण मी आई होणार, माझं बाळ असणार हे जास्त महत्वाचे आहे. माझी सासू नवऱ्याच दुसरं लग्न करायला निघाली होती ताई,या बाळा मूळ माझा संसार वाचला. मला लोक वांझ नाही बोलणार. हे एक स्वप्न होत अस मी मनाला समजावलं आहे. मला फक्त आई व्हायचे आहे . तुम्ही पण एक आई आणि बाई पण आहात तुम्ही मला समजून घ्याल .

मंजू तुझी मातृत्वाची आस बघता त्या पूढे नीती अनीती काहीच मायने नाही ठरत. तो एक क्षण आला आणि तुम्ही दोघ वाहवत गेला पण त्या क्षणाने तुला मातृत्व बहाल केले. त्यांनतर कधी त्या साहेबांनी तुझ्या शी तसे वर्तन केले का मंजू?  कुंदा ने विचारले.नाही ताई उलट त्यांनी माझी माफी मागितली पण मी ही तेवढिच जबाबदार आहे या साऱ्याला. साहेबांनी पुन्हा कधी माझ्या कडे त्या नजरेने बघितले पण नाही.मंजू ही गोष्ट फक्त आपल्या दोघीत राहील. हा माझा शब्द आहे तुला.ताई खूप आभारी आहे तुमची ,मला समजून घेतले. मंजू चे डोळे भरून आले होते.मंजू आता काळजी घे आणि बाळा ला जन्म दे . माझ्या कडे ये मी ट्रीटमेंट सुरू करते.हो ताई आनंदाने बोलत मंजू काम करून निघून गेली.खरच कधी कधी अज्ञानात सुख असते हे मंजू कडे बघून कुंदा ला समजले होते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama